Type Here to Get Search Results !

🛑नैसर्गिक आपत्ती काळात जनतेच्या मदतीला धावून जाणारे समाजसेवक बशीर हजवानी यांच्या दानशूरतेचे खासदार सुनिल तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे यांनी केले कौतुक,दिल्या शुभेच्छा


🛑नैसर्गिक आपत्ती काळात जनतेच्या मदतीला धावून जाणारे समाजसेवक बशीर हजवानी यांच्या दानशूरतेचे खासदार सुनिल तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे यांनी केले कौतुक,दिल्या शुभेच्छा

रायगड वेध म्हसळा - प्रतिनिधी श्रीकांत बिरवाडकर

संकटकाळी हाक मारताच जनतेच्या मदतीला धावुन जाणारे सेवाभावी वृत्तीचे"हजवानी फाउंडेशनचे संस्थापक" बशीर हजवानी यांनी कोकण किनार पट्टीत निसर्ग चक्रीवादळ आणि मागील जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे ओढवलेल्या संकटकाळात अन्न,वस्त्र,निवारा आणि आरोग्य सेवेसाठी जनतेला केलेली सढळ हस्ते मदत खुपच वाखाणण्याजोगी आहे. त्यांनी उदारमतवादी केलेल्या मदतीचे करावे तेवढे कौतुक थोडेचआहेत. बशीर हजवानी यांनी केलेल्या समाजकार्याची दखल रायगडचे खासदार सुनिल तटकरे आणि पालकमंत्री आदिती तटकरे यांनी घेतली आसुन त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल धन्यवाद देऊन शुभेच्छा दिल्या आहेत. बशीर हजवानी यांना दिलेल्या शुभेच्छा पत्रात खासदार आणि पालकमंत्री यांनी 03 जुन 2020 रोजी झालेल्या निसर्गचक्री वादळाचे आपत्तीत तसेच 20 व 21 जुलै 2021 रोजी महाड,चिपळूण आदि भागात अतिवृष्टीमुळे आलेले महापुर आणि दरडी कोसळून मोठया प्रमाणात जीवित व वित्त हानी होऊन तेथील जनजीवन विस्कळीत झाले होते.अशा वेळी आपत्तकालीन परस्थितीत आपद्ग्रस्तांचे जनजीवन पुर्ववत करण्यासाठी व त्यांचे मदतीला सामाजिक उत्तर दायित्व म्हणून धावत जावून हजवानी यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने जनतेला सर्वोतोपरी मदत करून सहकार्य केल्या बद्दल खासदार सुनिल तटकरे,पालकमंत्री आदिती तटकरे यांनी त्यांचे कामाचे कौतुक करीत मनोमन धन्यवाद दिले आहेत तशा आशयाचा पत्र समाजसेवक बशीर हजवानी यांना खासदार सुनिल तटकरे आणि पालकमंत्री आदिती तटकरे यांनी पाठवून शुभेच्छा दिल्या आहेत.
बशीर हजवानी यांनी निसर्ग चक्री वादळ आणि पुरपरस्थितीत रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक गाववाडीतील गोरगरीबांना अन्न,वस्त्र आणि पडझड झालेल्या घरांची दुरुस्ती करून दिली त्याच बरोबर आरोग्य सेवेसाठी विविध संस्थाचे ताब्यात दिलेल्या रुग्णवाहिकेची सेवा उपलब्ध करून दिली होती.हजवानी यांनी केलेली मदत थोडी थोडकी नसून ती पाच ते दहा करोडोच्या रकमेत असल्याचे सांगण्यात येते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test