Type Here to Get Search Results !

🛑 स्वदेस फाऊंडेशन ने रायगड व नाशिक जिल्ह्यासाठी देणगी दिलेल्या रूग्णवाहिकांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण


🛑 स्वदेस फाऊंडेशन ने रायगड व नाशिक जिल्ह्यासाठी देणगी दिलेल्या रूग्णवाहिकांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण

टिम रायगड वेध

 स्वदेस फाउंडेशन ने रायगड व नाशिक जिल्ह्यासाठी देणगी दिलेल्या 14 ॲम्बुलन्स चे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज मुंबई येथे करण्यात आले.

     यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रायगड जिल्ह्यामध्ये स्वदेस फाउंडेशनच्या ग्रामविकास व कोविड प्रतिबंधासाठी सुरू असलेल्या कामाचे कौतुक केले.

     या कार्यक्रमासाठी स्वदेस फाऊंडेशनचे प्रमुख रॉनी स्क्रूवाला, झरीना स्क्रूवाला, मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश वांगे, संचालक रंजिश कट्टडी, उपसंचालक तुषार इनामदार , महाव्यवस्थापक डॉ. सुरेंद्र यादव व १०८ बी.वी.जी ग्रूप चे अधिकारी उपस्थित होते.
       स्वदेस फाउंडेशन च्या वतीने रायगड जिल्ह्यातील 7 तालुक्यामध्ये या अत्याधुनिक सोयींनी युक्त अशा ॲम्बुलन्स मिळाल्यामुळे गरजू रुग्णांना आवश्यक त्या आरोग्य सुविधा मिळू शकणार आहेत, असे स्वदेश चे उपसंचालक श्री.तुषार इनामदार यांनी म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test