Type Here to Get Search Results !

🛑खुल्या निबंध स्पर्धेत नागोठण्यातील आनंदीबाई प्रधान महाविद्यालयाचे यश


🛑खुल्या निबंध स्पर्धेत नागोठण्यातील  आनंदीबाई प्रधान महाविद्यालयाचे यश

🛑अलिबाग येथील नेहरू युवा केंद्राचे आयोजन 
 
रायगड वेध नागोठणे प्रतिनिधी अनिल पवार

नेहरू युवा केंद्र, अलिबाग- रायगड द्वारा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानेआयोजित खुल्या जिल्हास्तरीय ऑनलाईन निबंध स्पर्धेत कोकण एज्युकेशन सोसायटीच्या नागोठण्यातील बापूसाहेब देशपांडे विद्यासंकुलातील आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या अनुक्रमे कु. अनुजा सुनिल वाटवे व कु. नेहा देवेंद्र गायकर यांना जिल्हा स्तरीय स्वच्छ भारत अभियान या विषयावर आयोजित निबंध स्पर्धेत तृतिय क्रमांकाचे बक्षिस विभागून जाहिर झाले आहे. सदर स्पर्धेसाठी महाविद्यालयातून सात विद्यार्थ्यांनी आपले निबंध रा. से. यो विभागामार्फत कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक डॉ.श्रीकृष्ण तुपारे यांनी नेहरू युवा केंद्र, अलिबाग-रायगड यांच्या कडे पी.डी.एफ फाईल द्वारे पाठवले होते. या निबंधांना मिळालेल्या यशाबद्दल महाविद्यालयचे प्राचार्य डॉ. संदेश गुरव, कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक डॉ. श्रीकृष्ण तुपारे, डॉ. पी. एन. ज्योती, डॉ. विकास शिंदे यांच्यासह सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी वर्गाने यशस्वी दोन्ही विद्यार्थींनींसह सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test