Type Here to Get Search Results !

🛑युवानेते रोहित विचारे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा


🛑युवानेते रोहित विचारे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा

रायगड वेध खालापूर - समाधान दिसले

       आताच्या घडीला बहुतांशी तरुण गाजावाजा व धुमधडाक्यात वायफळ खर्च करून आपला वाढदिवस मौजमजा करीत साजरा करतात, परंतु काही जण याला अपवाद ठरत असून अनेक सामाजिक उपक्रम हाती आपला वाढदिवस साजरा करित असताना आमदार महेंद्र थोरवेंचे अत्यंत विश्वासू सहकारी - युवानेते रोहित चंद्रकांत विचारे यांनी 27 अॉगस्ट रोजी आपला वाढदिवस सामाजिक बांधीलकी जपत यादिवशी खालापूरातील ग्रामीण करंबेळी ठाकूरवाडीत स्वखर्चाने 5000 हजार लिटर पाण्याची टाकी देत येथील शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप केल्याने सर्व आदिवासी - ठाकूर समाज बांधव आणि विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद पाहायला मिळाला तर रोहीत विचारे यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.
 
        युवानेते रोहित विचारे हे कर्जत खालापूर विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार महेंद्र थोरवे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जात असल्याने खालापूर तालुक्यातील आमदार थोरवेंचे बहुतांशी काम हे रोहीत विचारे हे मार्गी लावत असतात. आमदार थोरवेंनी दिलेली जबाबदारी रोहित विचारे पार पाडत असताना सामाजिक बांधीलकीचे भान मनात ठेवत विचारे हे सामाजिक कार्य सुध्दा तितक्याच जोखमीने पार पडत असून युवानेते रोहित विचारे यांनी 27 अॉगस्ट रोजी आपल्या वाढदिवसादिनी वायफळ खर्च न करता तोच खर्च समाज कार्यासाठी वापरत खालापूर तालुक्यातील करंबेळी ठाकूरवाडीमधील ग्रामस्थांची समस्या लक्षात घेऊन स्वखर्चाने 5000 हजार लिटर पाण्याची टाकी देत येथील शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप करीत अनोख्या पध्दतीने वाढदिवस साजरी केल्याने करंबेळी ठाकूरवाडीतील बांधवाच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला तर युवानेते विचारे यांच्या कार्याचे ग्रामस्थांनी तोंडभरून कौतुक करीत रोहित विचारे यासं वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
        याप्रसंगी तालुकाप्रमुख संतोष विचारे, उपतालुकाप्रमुख संजय देशमुख, पंचायत समिती सदस्य उत्तम परबळकर, रोहित विचारे, अभिषेक सुर्वे, विलास विचारे, अशोक मराजगे राजू विचारे, प्रभाकर भोसले, अशोक कांबेरे, अक्षय शितोळे, प्रशांत पाटील, पांडुरंग माडे, अंकूश माडे, चंद्रकांत माडे, पांडुरंग हिरवा, सोमा ढुमणे, मंगल्या माडे, शुभम माडे, वाळकू आगण, हिरामण माडे आदीप्रमुखासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ व शाळकरि विद्यार्थी उपस्थित होते.

      ज्या समाजात आपण जन्म घेतो - वावरतो त्या समाजाच आपण काहीतरी देणं लागतो हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून व मार्गदर्शक आमदार महेंद्र थोरवे साहेबांचा विकासाचा अजेंडा समोर ठेवत करंबेळी ठाकूरवाडीत पाण्याची टाकी व शाळेय साहित्य वाटपातून येथील बांधवाच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाले. तसेच यापुढे देखील सामाजिक कार्य करण्यास अजून ऊर्जा मिळाली आहे. तर माझ्या हातून जी मदत तेवढी मदत करण्यास मी प्रयत्नशील असेन.
रोहित विचारे (युवानेते)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test