Type Here to Get Search Results !

🛑जागतिक वडापाव दिन जाणून घेऊया आपल्या हक्काच्या वडापावबाबत


🛑जागतिक वडापाव दिन जाणून घेऊया आपल्या हक्काच्या वडापावबाबत

टिम रायगड वेध

वडा-पावचा वडा पहिल्यांदा मुंबईत गिरणी कामगारांच्या डोक्यातुन भूक भागवण्यासाठी सुचलेली कल्पना आहे. त्यामुळेच सर्वत्र तो मुंबई वडापाव असाच प्रसिद्ध पावला. वडापाव हा फक्त मुंबईतच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अगदी चवीने खाल्ला जातो. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये देखील वडापावची लोकप्रियता भरपूर आहे.वडा-पाव हा खाद्यपदार्थ जलद खाद्यपदार्थांच्या वर्गात येतो. त्याला महाराष्ट्राचा बर्गर असेही म्हणता येईल. वडा-पाव मुंबई परिसरात अतिशय लोकप्रिय आहे. वडा पाव सोबत तळलेली मिरची किव्हा लसणाची/कोथिंबिरीची चटणी खातात. या वडा-पावमधील वडा हा प्रत्यक्षात बटाटेवडा असून मेदू वडा नाही (ज्यालादेखील केवळ "वडा" म्हणून ओळखले जाते).
ह्या पदार्थाचे दोन मूळ भाग आहेत: वडा आणि पाव.

वडा करण्याची सर्वसाधारण कृती:

उकडलेला बटाटा कुस्करुन, त्यात मिरची, कोथिंबीर, आले, लसूण, हळद, कढूुलिंब, वगैरे मिसळून, त्याला हिंग-मोहरीची फोडणी देतात. अशाप्रकारे तयार झालेल्या मिश्रणाचे छोटे गोळे करून पाण्याने पातळ केलेल्या चण्याच्या पिठात बुडवून त्यांना मध्यम गरम तेलात तळून वडे बनविले जातात.
सोनेरी रंग झाला की वडे तयार झाले असे समजावे. वडे कढईतून काढताना अतिरिक्त तेल नितळू द्यावे. स्वछ टीप कागदावर वडे काढल्यास अतिरिक्त तेल कागदात शोषले जाते.
पाव सहसा घरात न बनवता बेकरीमधून आणला जातो. ह्या पावाची एक विशिष्ट चव असते.

मुंबईचे नाव तोंडात येताच आपल्याला तिथल्या बऱ्याच प्रसिद्ध गोष्टींची आठवण येते, त्यापैकीच मुंबईतील एक प्रसिद्ध गोष्ट आठवते ती म्हणजे वडापाव ! आणि मुंबईत सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थामध्ये वडापाव एक नंबर ला आहे. आपणही जर मुंबई ला गेले असाल किंवा राहत असाल तर आपण कधीतरी वडापाव ची चव घेऊन पहिली असेलच. कमी पैशांमध्ये पोटाची खळगी भरणाऱ्या खाद्यपदार्थात वडापाव चा समावेश होतो. मुंबईत काही लोक तर फक्त वडापाव वर आपले जीवन जगतात. आपणही जेव्हा ऑफिसला जातांना घरून काही खाऊन निघालो नाही तर आपणही नाश्ता म्हणून वडापाव ला प्राधान्य देतो. पण बरेचदा खाताना काही लोकांच्या मनात हा विचार आला असेल की या वडापावची सुरुवात कोठून झाली असेल? कोणी याची सुरुवात केली असेल? असे अनेक प्रश्न वडापाव विषयी आपल्याला कधी ना कधी पडले असतील च तर आजच्या लेखात आपण पाहणार आहोत की वडापाव ची सुरुवात कोठून झाली होती?आणि कोनी केली होती? आशा करतो आपल्याला लिहिलेला लेख आवडणार, तर चला पाहूया..

चमचमीत वडापाव ची सुरुवात भारतात अश्या प्रकारे झाली! 

वडापाव एक प्रसिद्ध डिश आहे. एका पावाला मधोमध कापून त्यामध्ये आलुच्या चटणीच्या गोळ्याला तेलात तळून घेतलेलं असते आणि त्या गोळ्याला पावाच्या मध्ये टाकून खाल्ले जातं. वडापाव खायला खूप चवदार लागतो. त्याच्या नावानेही आपल्या तोंडात पाणी येत.

वडापाव ची सुरुवात कशी झाली? 

आजपासून ५७ वर्षाअगोदार १९६६ मध्ये वडापाव ला अशोक वैद्य या व्यक्तीने दादर च्या रेल्वे स्टेशन वर वडापाव विकण्याला सुरुवात केली होती. आणि त्यांनी सर्वात आधी वडापाव चा स्टॉल लावला होता.१९७० आणि १९८० च्या दरम्यान जेव्हा महाराष्ट्रात अनेक कारखाने बंद झाले होते. तेव्हा तेथील हजारो मजुरांना कामाची कमतरता भासली होती, तेव्हा त्यापैकी अनेकांनी वडापाव चे स्टॉल लावून आपल्या धंद्याला सुरुवात केली होती. आणि या साठी त्यांना आपल्या महाराष्ट्रातील महत्त्वाचा पक्ष शिवसेनेने हे काम करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केले होते. जेव्हा शिवसेनेच्या बैठका होत होत्या तेव्हा तेथील लोकांना वडापाव चा अल्पोआहार देण्यात येत असे.
तेव्हा दक्षिण भारताची प्रसिध्द डिश उडुपी खूप मोठ्या प्रमाणात खाल्ली जायची पण जेव्हा वडापाव ची सुरुवात झाली तेव्हा वडापाव ने त्या डिश ला सुध्दा मागे टाकले जाते. आणि देशाच्या प्रत्येक राज्यात आज मुंबईचा वडापाव म्हणून ही डिश प्रसिध्द झालेली आहे.
१७ व्या शतकात युरोपातील देशातून आलू आणि पाव हे खायचे पदार्थ आले होते. परंतु त्यांना योग्य प्रकारे भारतात बनविल्या गेल्या. सर्वात आधी वडापाव ही डिश आपल्या देशात बनविल्या गेली होती.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test