🛑तळा येथे कृषी विभागामार्फत रानभाज्या महोत्सव
रायगड वेध तळा प्रतिनिधी श्रीकांत नांदगावकर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माणसाने प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर तळा कृषी विभागाच्या वतीने तळा एसटी स्टॅन्ड येथे रानभाज्या महोत्सवाचे आयोजन दि.१२ ऑगस्ट रोजी करण्यात आले होते. या महोत्सवाचे उद्घाटन पंचायत समिती सभापती अक्षरा कदम, व नगराध्यक्षा रेश्मा मुंढे यांच्या हस्ते करण्यात आले. आत्ताच्या आधुनिक काळामध्ये आदिवासी बांधवांनी रानभाज्यांचे महत्व टिकवून ठेवले आहे. राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्या संकल्पनेतून रानभाज्यांचे महत्व व त्यांचे पौष्टिक औषधी गुणधर्म विचारात घेऊन त्याची प्रचार प्रसिद्धी व ओळख जास्तीत जास्त लोकांना पोचण्यासाठी राज्यभर रानभाज्या महोत्सव साजरा केला जात आहे. या महोत्सवामध्ये ३० प्रकारच्या रानभाज्या प्रदर्शनात मांडण्यात आल्या होत्या. प्रदर्शनामध्ये मेढे सरपंच मधुकर वारंगे, वावे सरपंच माधुरी पारावे,मोहम्मद परदेशी,सुरेश कजबळे, सखाराम जाधव,सुरेश बोडेरे या शेतकऱ्यांनी सहभाग घेतला यावेळी तालुका कृषी अधिकारी सागर वाडकर, व कृषी विभागातील सर्व क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते.