🛑लस घेण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रावर तुडुंब गर्दी
🛑पहाटे ३ वाजताच नागरिक ठोठावतात डॉक्टरांचा दरवाजा
रायगड वेध तळा प्रतिनिधी श्रीकांत नांदगावकर
तळा प्राथमिक आरोग्य केंद्रात लस घेण्यासाठी नागरिकांची तुडुंब गर्दी होत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. लसीसाठी पहाटे ३ वाजताच नागरिक डॉक्टरांचा दरवाजा ठोठावत असल्याने डॉक्टरांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.संपूर्ण राज्यात लसीचा तुटवडा सुरू असून ठराविक प्रमाणात लसीचे डोस उपलब्ध होत आहेत.रविवारी सायंकाळी पहिल्या लसीचे अवघे १०० डोस तळा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध झाले होते त्याचे वितरण सोमवारी सकाळी आठ वाजल्यापासून करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली होती.परंतु नागरिकांनी रात्री तीन वाजल्यापासूनच प्राथमिक आरोग्य केंद्रात गर्दी केली होती.एव्हढेच नाही तर शेजारी रहात असलेल्या डॉक्टरांचा मध्यरात्री दरवाजा ठोठावून त्यांना लस देण्यासाठी दबाव टाकत होते.त्यामुळे कामाचा आधिच ताण असलेल्या डॉक्टरांना लसीसाठी होत असलेल्या नागरिकांच्या गर्दीमुळे सुखाची झोप मिळणे सुद्धा कठीण झाले आहे.