Type Here to Get Search Results !

🛑माणगांवमध्ये प्राण्याच्या मांसाची वाहतूक करणाऱ्या ४ आरोपींना पोलिसांनी पकडले रंगेहाथ, ११४० किलो मांस जप्त.


🛑माणगांवमध्ये प्राण्याच्या मांसाची वाहतूक करणाऱ्या ४ आरोपींना पोलिसांनी पकडले रंगेहाथ 

🛑११४० किलो मांस जप्त.

रायगड वेध माणगांव प्रतिनिधी गिरीश गोरेगावकर

     महाराष्ट्र राज्यात प्राणी हत्याबंदी कायदा लागू असताना रायगड जिलह्यामध्ये मागील काही महिने व काही आठवड्यापासून प्राण्यांची कत्तल व मांस वाहतूक या प्रकारचे गुन्हे वारंवार घडताना दिसून येत आहेत. अशाच प्रकारची घटना माणगाव पुणे दिघी हायवेवर घडली असून यामध्ये माणगांव पोलिसांनी तब्बल ११४० किलो मांस जप्त केले आहे.
   याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक १८ ऑगस्ट रोजी सकाळी ११:३० वाजण्याच्या सुमारास पोलीस कर्मचारी नाथा दहिफळे याच्या फिर्यादी नुसार पुणे दिघी हायवेवर मोर्बा रोडवर गोद नदीच्या पुलाजवळ पिक अप क्रमांक एम एच ०३ सी व्ही ८८५३ हिला पोलिसांनी विचारणा केली की, गाडीत वाहतूक करत असलेले कोणत्यातरी जनावरांचे मांस हे कुणाकडून आणले आहे. तरी पिकअप मध्ये उपस्थित असलेल्या आरोपी मन्सूर रेहमान सारंग, अल्ताफ ऐजाज कुरेशी, असिफ अमरुद्दीन कुरेशी यांनी हा माल शमीम उर्फ पप्पन कुरेशी रा. मोर्बा ता माणगांव यांच्या कडून आणला आहे असे पोलिसांना सांगण्यात आले. 
   या कारवाईमध्ये माणगांव पोलिसांनी एक पांढऱ्या रंगाचा पिकअप व त्यात ११४० किलो वजनाचे कोणत्यातरी जनावरांचे मास असा एकूण १०६३०००/- चा मुद्देमाल जप्त केला आहे. यातील आरोपी पप्पन कुरेशी याच्यावर देवनार पोलीस ठाणे, शिवाजी नगर पोलीस ठाणे मुंबई व माणगांव पोलीस ठाणे येथे या अगोदर देखील प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम १९९५ कलम ५ प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.  
    याबाबत माणगांव पोलीस ठाणे येथे कॉ. गु. र. नं. १८६/२०२१ भा. दं. वि. सं. क. ४२९, ३७९, ३४ सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधि. नियम १९९५ कलम ५ क, ९ अ, भारतीय प्राणी संरक्षण अधिनियम १९६० चे कलम १० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो. नि. अश्वनाथ खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स. पो. नि. कावळे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test