Type Here to Get Search Results !

🛑आज पहिला श्रावणी सोमवार, जाणून घेऊया बेलाचे महत्व


🛑आज पहिला श्रावणी सोमवार, जाणून घेऊया बेलाचे महत्व 

टिम रायगड वेध

मित्रांनो श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि भगवान भोलेनाथाना प्रसन्न करण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने काही ना काहीतरी प्रयत्न करत असतो, काहीतरी उपाय नक्की करत असतो. तर आपण सुद्धा भोलेनाथाना प्रसन्न करण्यासाठी बेलपत्र म्हणजेच बेलाची पानं शिवलिंगावर अर्पण करत असतो. तेव्हा  शिवलिंगावर अर्पण करता त्यावेळी शिवशंकर आपल्यावर प्रसन्न होतात. ही बेलाची पानं भोलेनाथांचे मस्तिष्क शीतल बनवतात, शांत बनवतात आणि म्हणूनच भगवान भोळेनाथांचा आशीर्वाद आपणास नक्की मिळतो. बेलपत्र तोडताना आणि ती भगवान भोलेनाथांना अर्पण करताना काही नियमांचं आपण नक्की पालन करायला हवं. आपण आपल्या संस्कृतीमध्ये धर्माचं पालन करताना त्या निसर्गाचं सुद्धा रक्षण होईल, याची पुरेपूर काळजी घेतली पाहिजे आणि म्हणूनच देवी-देवतांना जी फुल आणि पान आपण अर्पित करतो. ही फुल आणि पान सोडण्यास संबंधी काही नियम बनवण्यात आलेले आहे. आज आपण पाहणार आहोत की, ही बेलपत्र म्हणजे बेलाची पानं तोडताना आपण कोणती काळजी घ्यावी. तसेच बेलाची पानं महादेवांना वाहताना आपण कोणत्या नियमांचं पालन करावे. पहिली गोष्ट चतुर्थी, अष्टमी, नवमी, चतुर्दशी आणि अमावस्या या ज्या तिथी आहेत, तसेच संक्रांती आणि सोमवार या दिवशी चुकूनही आपण बेलपत्र तोडू नयेत. या दिवसाच्या आदल्या दिवशी आपण बेलाची पान तोडू शकता. तुम्हाला माहितीये की बेलाची पानं भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय आहेत, मात्र या तिथीला ती अजिबात तोडू नयेत. आदल्या दिवशी ती तोडली तर चालतं लक्षात घ्या, बेलाची पानं ही कधीही शिळे होत असतात. ती आपण स्वच्छ धुवून महादेवांना नक्की अर्पण करा. ही पानं तुम्ही कोणत्याही दिवशी तोडलेली महादेवांना अर्पण केली तर चालतं.  शास्त्रांमध्ये असे सांगितले आहे की जर तुम्हाला नवीन बेल पत्र मिळालं नाही, तर तुम्ही दुसऱ्या व्यक्तीने वाहिलेलं बेलपत्र सुद्धा पाण्याने स्वच्छ धुऊन ते पुन्हा महादेवांना अर्पण करू शकता. म्हणजे त्याचा तुम्ही पुन्हा पुन्हा वापर करू शकता. स्कंदपुराणात देखील असे उल्लेखित आहे. बेलाची पान तोडताना लक्षात घ्या, की बरेच जण अगदी फांद्या तोडून आणतात तरी अत्यंत चुकीची पद्धत आहे. बेलपत्र तोडताना बेलाच्या झाडाला कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही, नुकसान होणार नाही, याची आपण पुरेपूर काळजी घ्यायला हवी.  ही पानं तोडताना केवळ पान तोडावीत. त्याच्या फांद्या तोडू नये, झाडाला कोणतेही नुकसान पोहोचवू नये आणि ही पानं तोडण्याच्या आधी आणि तोडल्यानंतर बेलाच्या झाडाला मनोमन प्रणाम करावा. मनातल्या मनात त्याचे आभार मानावेत. ही पानं तोडल्यानंतर ती शिवलिंगावर ती आपण कशाप्रकारे अर्पण करावीत, मित्रांनो महादेवांना बेलपत्र अर्पण करताना ती नेहमी उलटी अर्पण केली जातात. म्हणजेच जो वरचा भाग असतो तो पालथा घालून आपणही बेलपत्र महादेवाला अर्पण करायचे असतात. ही तीन पानांपासून ते अकरा पर्यंत पर्यंत आपल्याला मिळतात. म्हणजे त्याची जी दल असतात हे तीन पासून ते अकरापर्यंत आपल्याला मिळतात. त्याची जी दल असतात ती जितकी जास्त असतील तितके बेलपत्र जास्त उत्तम मानलं जातं आणि म्हणून जर अस बेलपत्र तुम्हाला मिळालं, तर ते सौभाग्याचे लक्षण मानावे आणि ते महादेवांना नक्की अर्पण करा.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test