🛑शाळा सुरू करण्याचा निर्णय तुर्तास स्थगित, मुख्यमंत्री निर्णय घेणार
टिम रायगड वेध
१७ ऑगस्टपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय तूर्तास लांबणीवर टाकण्यात आला आहे. पण, याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे घेणार आहे. टास्कफोर्स व प्रमुख अधिका-यांची मंत्रालयात बैठक झाली. त्यात शाळा सुरु करणे तूर्तास लांबणीवर टाकावे असे सुचविण्यात आले आहे. कोरोनाचा संसर्ग मुलांमध्ये लवकर होतो. त्यामुळे तिस-या लाटेच्या पार्श्वभूमीवर हे सांगण्यात आले आहे. राज्यातील शाळा १७ ऑगस्टपासून सुरू करण्याचा अगोदर निर्णय झाला. त्यासाठी सरकारने परिपत्रक काढले. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन करण्यासाठी स्थापन केलेल्या टास्क फोर्सचा याला विरोध होता. पण, तरी शिक्षण विभागाकडून शाळा सुरू करण्याची नियमावली जाहीर करण्यात आली. टास्क फोर्सने दिवाळीनंतर शाळा सुरू करण्याचा सल्ला दिला होता. पण, आता शिक्षण विभागाने निर्णय़ घेतल्यानंतर आता त्यात बदल केला जाणार आहे. या सर्व प्रकारामुळे विद्यार्थी व शिक्षक मात्र गोंधळले आहे.