Type Here to Get Search Results !

🛑तळा प्रेस क्लब तर्फे नवनियुक्त पोलीस निरीक्षकांचा सत्कार


🛑तळा प्रेस क्लब तर्फे नवनियुक्त पोलीस निरीक्षकांचा सत्कार

रायगड वेध तळा श्रीकांत नांदगावकर

तळा पोलिस ठाणे येथे रुजू झालेल्या नवनियुक्त पोलिस निरीक्षक गोविंद ओमासे यांचा तळा प्रेस क्लब तर्फे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.याप्रसंगी अध्यक्ष संजय रिकामे,उपाध्यक्ष किशोर पितळे,सल्लागार पुरुषोत्तम मुळे, सचिव संध्या पिंगळे,नजीर पठाण आदी मान्यवर उपस्थित होते.अल्पावधीतच आपल्या कार्याचा वेगळाच ठसा उमटवत इथल्या सर्वसामान्य नागरिकांशी नाळ जुळलेले पोलीस निरीक्षक सुरेश गेंगजे यांची अलिबाग येथे बदली झाली आहे.सुरेश गेंगजे हे आलेल्या नागरिकांच्या समस्या ऐकून त्या सामंजस्याने ते सोडवत असत तसेच केवल शासकीय मानधनासाठी काम न करता शासनाने दिलेल्या जबाबदारी सोबतच सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात सहभागी होऊन फिल्डवर काम करणारे आजवरचे एकमेव शासकीय अधिकारी म्हणून सुरेश गेंगजे यांच्या नावाचा आवर्जून उल्लेख होत आहे.तळा येथील आपल्या कारकिर्दीत त्यांनी अनेकदा आपल्या कर्तव्याच्या पलीकडे जाऊन तळावासीयांना साथ दिली.कोरोना काळात त्यांनी पार पडलेल्या भूमिकेमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक झाले.त्यांची आलीबाग येथे बदली झाल्याने आदल्या दिवशी तालुक्यातील मान्यवरांकडून त्यांचा निरोप समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला.तसेच त्यांच्या जागी डहाणू येथून तळा येथे पोलिस निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आलेले गोविंद ओमासे यांचा तळा प्रेसक्लब तर्फे सत्कार करण्यात आला.यावेळी पत्रकारांनी नवनिर्वाचित पोलीस निरीक्षकांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.तसेच पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test