Type Here to Get Search Results !

🛑तळा तालुक्याच्या विकासासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना निवेदन


🛑तळा तालुक्याच्या विकासासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना निवेदन

रायगड वेध तळा श्रीकांत नांदगावकर

तळा तालुका हा मागासलेला तालुका असून त्याचा सर्वांगीण विकास करण्यात यावा यासाठी तळा भाजपतर्फे केंद्रीय सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांना जनआशीर्वाद यात्रेदरम्यान निवेदन देण्यात आले.केंद्रीय मंत्री नारायण राणे हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी १९९९ साली तळा तालुक्याची स्वतंत्र निर्मिती केली. परंतु त्यानंतर बराच कालावधी लोटला असून अद्यापही तालुक्यात उद्योग व्यवसायाला कोणतीही चालना मिळालेली नाही. या कारणाने तालुक्यातील युवा पिढी व नागरिक रोजगारा निमित्त मुंबई, पुणे सारख्या शहरात स्थलांतरित झाली आहेत.गावच्या गावे ओस पडली असल्याने तालुक्याचा सर्वांगीण विकास खुंटला आहे.त्यामुळे तालुक्याचा औद्योगिक विकास करून तालुक्यात सूक्ष्म,लघु व मध्यम उद्योग निर्मिती करावी तसेच तळा शहरातील तळगड या ऐतिहासिक किल्ल्याचा दगडाचा भाग सुटलेला असल्याने तो भाग कोसळण्याची दाट शक्यता आहे.व सदर किल्ल्याचा दगडाचा भाग कोसळल्यास पुसाटी, पुसाटी ब्राम्हण आळी, कुंभार आळी, जोगवाडी या गावातील घरांचे नुकसान होऊन मानवहानी होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे पुरातत्व खात्यामार्फत आवश्यक उपाययोजना करून तळा तालुक्यातील ऐतिहासिक वास्तूचा भाग कोसळण्यापूर्वी त्याची दखल घेण्याबाबत संबंधित विभागाला सूचना कराव्यात अशा अशयाचे निवेदन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना देण्यात आले याप्रसंगी प्रदेश सचिव रवि मुंढे, तालुका प्रमुख ऍड निलेश रातवडकर,युवा मोर्चा उपजिल्हाध्यक्ष रितेश मुंढे,मा. तालुका अध्यक्ष कैलास पायगुडे, नगराध्यक्षा रेश्मा मुंढे,ऍड दिव्या रातवडकर,शहराध्यक्ष सुधीर तळकर यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test