Type Here to Get Search Results !

🛑नागोठणे जवळील वरवठणे आदिवासी वाडी येथे चार गुरांची हत्या, मांस घेऊन अज्ञात इसमांचा पोबाराशोध घेण्याचा पोलिसांसमोर आव्हान

🛑नागोठणे जवळील वरवठणे आदिवासी वाडी येथे चार गुरांची हत्या

🛑मांस घेऊन अज्ञात इसमांचा पोबारा
शोध घेण्याचा पोलिसांसमोर आव्हान

रायगड वेध नागोठणे प्रतिनिधी अनिल पवार

रोहा तालुक्यातील नागोठणे जवळील वरवठणे आदिवासी वाडीकडे जाणार्या रस्त्यावर खदानी कुशल्याचा माळ येथे रविवार दि.२२ रोजी रात्री ०१ ते ०३ वाजण्याचा दरम्यान चार ठिकाणी गुरांचा कत्तल करून गोमांस घेऊन अज्ञात इसमांनी पोबारा केला.दरम्यान याच ठिकाणी या आधीही चार वेळा अशा घटना घडल्याचे उपस्थितांकडून सांगण्यात आले. या घटनेेनंतर नागोठणे पोलीसांसमोर अज्ञात इसमांचा शोध घेेेेेेेेण्याचे आव्हान आहे.

या संदर्भात मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार नागोठणे पोलीस ठाण्याचे हद्दीतील वरवठणे आदिवासी वाडीकडे जाणार्या रस्त्यावर खदानी कुशल्याचा माळ येथे गवतात चार ठिकाणी गुरांची हत्या केली असल्याचे या ठिकाणी दि.२२ रोजी सकाळी फिरायला गेलेले वरवठणे येथील सामाजिक कार्यकर्ते किशोरभाई म्हात्रे यांच्या निदर्शनास आले. या ठिकाणी गुरांची विष्ठा तसेच रक्त चार ठिकाणी पडलेले दिसून आले. या घटनेची तात्काळ माहिती म्हात्रे यांनी नागोठणे पोलीस ठाण्यात दिली. सदर घटनेची माहिती मिळताच नागोठणे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयकुमार देशमुख यांना मिळताच एएसआय दयानंद ठाकूर,पो.ह.प्रमोद कदम, विनोद पाटील,चंद्रकांत पाटील, गणेश भोईर, युवराज म्हात्रे,पो.ना.नितेश पाटील,पो.शि.निलेश कोंडार यांच्या सह घटना स्थळी जाऊन त्याठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली.तसेच त्या ठिकाणी पोलीसांकडून पंचनामा करण्यात आला.या घटने संदर्भात सामाजिक कार्यकर्ते किशोरभाई म्हात्रे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नागोठणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी वरवठणे ग्रामपंचायत माजी सरपंच गणपत शेठ म्हात्रे, हिंदू जनजागृती समितीचे अध्यक्ष योगेश ठाकुर, निलेश भोपी, बापूमहाराज रावकर,विकी म्हात्रे, राकेश म्हात्रे, रवींद्र म्हात्रे यांच्या सह वरवठणे आदिवासी वाडीतील आदिवासी बांधव उपस्थित होते. या संदर्भात अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे पोलीस करीत आहेत.
दरम्यान अनेक ठिकाणी मोकाट फिरणारी गुरे यातच आठ दिवसांपूर्वीच कडसुरे व कुहीरे यादरम्यान असणाऱ्या नर्सरी मध्ये घडलेली अशीच घटना या पार्श्वभूमीवर विभागातील सर्व ग्रामपंचायतींना हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आपल्या गावातील गुरे मालकांना त्यांच्याकडे असलेल्या गुरांची योग्य ती उपाययोजना करणे संबंधी पत्र देणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच प्रत्येक ग्रामपंचायतीने गाव पातळीवर ग्राम समिती स्थापन करून याकडे लक्ष देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test