Type Here to Get Search Results !

🛑श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे...मन प्रसन्न करणाऱ्या श्रावण महिन्याला प्रारंभ.


🛑श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे...
मन प्रसन्न करणाऱ्या श्रावण महिन्याला प्रारंभ.

रायगड वेध तळा प्रतिनिधी श्रीकांत नांदगावकर
 
वर्षभरात ज्या महिन्यात मन प्रसन्न राहते अशा श्रावण महिन्याला आजपासून प्रारंभ झाला आहे. पावसाळा हा एकच ऋतू असा आहे की जो त्याच्या चारही महिन्यात आपल्याला त्याच्या वेगवेगळ्या छटा दाखवितो. म्हणजेच जेष्ठ आषाढातील पाऊस हा नेहमी जोरदार असतो तर श्रावणातील पाऊस हा रिमझिम करीत असतो. श्रावणातील पावसात निसर्गाला जणू काही स्वर्गाचेच रूप प्राप्त झालेले असते.श्रावण महिना आला की घरात सणाची चाहूल लागते. एकामागून एक सण सुरू होतात व घरातील वातावरण धार्मिक होऊन जाते. कोणी उपवास करतो, कोणी देवदर्शन करतो. व्रत करण्यास हा महिना अतिशय चांगला मानला जातो. श्रावण महिन्यात प्रत्येक वारी कोणत्या न कोणत्या देवतेचे व्रत, पूजा करण्याची परंपरा आहे. कित्येक लोक महिनाभर उपवास करतात, तर काही जण ठरावीक वारी उपवास करतात.श्रावण महिन्यात श्रावणी सोमवारचे महत्त्व अनन्यसाधारण असते.महादेवाची श्रावणातील पूजा फलदायी मानली जाते. आपल्या रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून वेळ काढून परत अध्यात्म, जप, तप यांकडे वळून भाविक आपल्या आयुष्याची दिशा तपासतात. रोज चालणाऱ्या धावपळीतून मनाला पुन्हा एका ठिकाणी शुचिर्भूत करतात.श्रावणात सर्वत्र हिरवे निसर्ग बहरलेले असल्याने निसर्गाने जणू हिरवी शाल पांघरलेली असल्याचे चित्र भासते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test