Type Here to Get Search Results !

🛑तळा येथील पोलीस ठाण्याला हस्तांतरित केलेल्या जागेला रोहिदास ग्रामस्थांचा विरोध


🛑तळा येथील पोलीस ठाण्याला हस्तांतरित केलेल्या जागेला रोहिदास ग्रामस्थांचा विरोध

रायगड वेध तळा प्रतिनिधी श्रीकांत नांदगावकर

 तळा येथे पोलीस ठाण्याला हस्तांतरित करण्यात आलेल्या जागेला रोहिदास ग्रामस्थांकडून तीव्र विरोध करण्यात आला आहे. शहरातील नगरपंचायत हद्दीतील सिटी सर्व्हे क्र.१२९९ ही सरकारी पड असलेली जमीन तळा पोलीस ठाण्यासाठी हस्तांतरित करण्यात आली आहे त्याला शहरातील रोहिदासवाडी ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.या संदर्भात रोहिदास ग्रामस्थांकडून नगरपंचायत, तहसील,जिल्हाधिकारी कार्यालय आदी ठिकाणी निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की सदर जागेत गेल्या ४० ते ५० वर्षांपासून रोहिदास समाजाची वहिवाट असून गावातील स्थानिक लोकांच्या गवताच्या झोपड्या आहेत ज्याचा उपयोग कित्येक वर्षांपासून लाकूड फाटा ठेवण्यासाठी करण्यात येत आहे.तसेच सदर जागेत रोहिदास ग्रामस्थांची लहान मृत बालकांची दफनभूमी असून कित्येक वर्षांपासून सदर जागेचा लहान मृत बालकांची दफनभूमी म्हणून वापर करण्यात येत आहे.सदर जागेची मोजणी करताना ग्रामस्थांना कोणतीही आगाऊ नोटीस न देता ग्रामस्थांच्या अपरोक्ष मोजणी करण्याचे प्रयत्न करण्यात आलेले आहेत. या जागेची परस्पररित्या मोजणी केल्यानंतर सायंकाळी पाच च्या सुमारास ग्रामस्थांना मोजणी नोटिसा प्राप्त झाल्या.त्यावेळी ग्रामस्थ मिळकतीची पाहणी करण्यासाठी गेले असता काही स्थानिक पोलिसांकडून ग्रामस्थांना धमकण्यात आले असल्याने हा रोहिदास ग्रामस्थांवर एकप्रकारे अन्याय केल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे.त्यामुळे प्रशासनाने सदर मिळकत ही तबदिली करण्याबाबत घेण्यात आलेला ठराव तात्काळ रद्द करावा.व सदर मिळकत ही रोहिदास ग्रामस्थांना तबदिली करावी अशी मागणी रोहिदास ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test