Type Here to Get Search Results !

🛑रानसई येथील कंपनीत भूमीपुत्राला कामावर पुर्ववत होण्यासाठी करावा लागतो संघर्ष - भूमीपुत्राला न्याय मिळावा म्हणून रानसईकर ग्रामस्थ आक्रमक


🛑रानसई येथील कंपनीत भूमीपुत्राला कामावर पुर्ववत होण्यासाठी करावा लागतो संघर्ष - भूमीपुत्राला न्याय मिळावा म्हणून रानसईकर ग्रामस्थ आक्रमक


खालापूर - रायगड वेध ब्युरो रिपोर्ट


             खालापूर तालुक्यातील रानसई गावानजदिक डाळ निर्मिती करणारी असून कंपनीत असंख्य तरुण काम करीत आपल्या कुटुंबाचा गाढा ओढत आहेत, परंतु याच कंपनीत भूमिपुत्र कामगार व कंपनी व्यवस्थापन संघर्ष पेटल्याने याठिकाणी भूमिपुत्राला न्याय मिळावा म्हणून रानसई गावातील ग्रामस्थ आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. या कंपनी राज मोरे म्हणून तरुण गेल्या दोन वर्षाहून अधिक काळापासून काम करीत कंपनीत आपले कर्तव्य बजावत असताना 9 अॉगस्ट रोजी राज नित्यनियमाप्रमाणे कामावर आला असता वॉचमन त्याला कंपनी गेटवर आडवत आजपासून तुला कंपनी प्रवेश बंद करण्यात आल्याचे सांगितल्याने राजच्या पाया खालची वाळू सरकली. तर राजने कंपनीत घ्यावे यासाठी अनेकदा कंपनी व्यवस्थापनाला विनवणी केली असता कंपनीने व्यवस्थापनाने राजला कामावर रुजू न करून घेतल्याने राजने न्याय मिळेल म्हणून शासकीय स्तरावरून पत्रव्यवहार केले असतानाही या कामाला न्याय मिळाल्याने रानसई मधील ग्रामस्थ आक्रमक झाले असून लवकरच या कामगाराला कामावर रुजू करून न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहेत. 

        खालापूर तालुक्याला औद्योगिक नगरीच माहेरघर म्हटलं जात असल तरी या माहेरघरातील औद्योगिक नगरीत भुमीपुत्रांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी संघर्ष त्याचबरोबर वणवण करावी लागत असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक स्थानिक भुमिपुत्र विरोध कंपनी व्यवस्थापन असा संघर्ष ही समोर येत आहे, असाच संघर्ष तालुक्यातील रानसई जवळील डाळ निर्मिती करणाऱ्या कंपनीत झाल्याने याठिकाणी स्थानिक ग्रामस्थ विरूद्ध कंपनी व्यवस्थापनात सुरू झाला आहे.

       रानसई येथील डाळ निर्मिती करणाऱ्या कंपनीत रानसई गावातील राज मोरे म्हणून तरुण गेल्या दोन वर्षाहून अधिक काळात पासून तुटपुंज्या पगारावर काम करीत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे, मात्र 9 अॉगस्ट पासून कंपनी व्यवस्थापनाने कोणतीही सुचना न देता राज मोरे कामगारांला तडकफडकी कामावरून काढल्याने या कामगारांवर उपासमारीची वेळ येऊ ठेपली आहे. तर कंपनीत पुन्हा कामाला घ्यावे म्हणून राज मोरे या कामगारांने व्यवस्थापनापुढे वेळोवेळी विनवणी केली असतानाही राज मोरे कामगारांचे कामावर न घेतल्याने राजने न्याय मिळेल म्हणून शासकीय स्तरावरून पत्रव्यवहार केले असतानाही या कामाला न्याय मिळाल्याने रानसई मधील ग्रामस्थ आक्रमक झाले. तर येत्या काही दिवसात या कामगारांला न्याय मिळाला नाहीतर याठिकाणी स्थानिक ग्रामस्थ विरूद्ध कंपनी व्यवस्थापन संघर्ष पेटेल यात तिळमात्र शंका नाही.

     डाल उत्पादन करणारी कंपनी स्थानिक भुमिपुत्रावर अन्याय करीत असेल तर तो अन्याय कधापी सहन करणार नाही, या कामगाराला न्याय न मिळाल्यास ही सर्व व्यथा लवकरच युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्याकडे मांडणार आहे. 
महेश पाटील (युवासेना तालुका अधिकारी)

        रानसई गावाच्या हद्दीत असणारी डाळ उत्पादन करणारी कंपनी असून या कंपनीतील व्यवस्थापनाकडून स्थानिक कामगारांची पिळवणूक होत आहे, तर कंपनी व्यवस्थापन मनमानी निर्णय घेत स्थानिक भुमिपुत्राला कामावरून काढून टाकल्याने या भुमिपुत्रावर उपासमारीची वेळ येऊ ठेपल्याने या कामगाराला न्याय मिळावा म्हणून आम्ही बहुतांशी ग्रामस्थ एकत्र या तरुणांच्या बाजूने खंबीर उभी राहू, वेळ पडली तर तीव्र उपोषण करून मनमानी काम करणाऱ्या व्यवस्थापना अद्दल घडवू
प्रभाकर मोरे (रानसई ग्रामस्थ)


      राज मोरेसह स्थानिक अनेक कामगारावर अन्याय होत असुन कंपनी ठेकेदाराला हाताशी घेऊन पिळवणूक करित असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. तर अनेक कामगारांची कंपनीमध्ये जाताना नावाने नोंदच होत नाही, सुरक्षेचे कोणतेच नियम पळले जात नाहीत. तसेच अनेक कामगारांना बँक अकाऊंट सँलरी ऐवजी रोख पगार केला जातो व कंपनीमुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे अनेक आरोग्य विषय समस्यांचा गावकऱ्यांना सामोरे जावे लागत असल्याने गावकरी मंडळी व स्थानिक ग्रामस्थ नाराजी व्यक्त करित आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test