Type Here to Get Search Results !

🛑डॉ. महेंद्र कल्याणकर रायगडचे नवे जिल्हाधिकारी


🛑डॉ. महेंद्र कल्याणकर रायगडचे नवीन जिल्हाधिकारी

टिम रायगड वेध

राज्यातील १४ आयएएस अधिकाऱ्यांची काही दिवसांपूर्वी बदली करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा ५ आयएएस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. डॉ. महेंद्र कल्याणकर यांची रायगडचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच एम. बी. वरभुवन (मंत्रालय जीएडी कनिष्ठ सचिव) यांची बदली करुन त्यांना अतिरिक्त आदिवासी आयुक्त, ठाणे म्हणून नियुक्त केले आहे.
याशिवाय संजय मीणा यांची गडचिरोलीच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. त्यांनी ठाण्यातील अतिरिक्त आयुक्त म्हणून काम पाहिले आहे.
निधी चौधरी (रायगड जिल्हाधिकारी) यांना मुंबईच्या आयटी, डायरेक्‍टर म्हणून नियुक्त केले आहे. दीपक सिंगला (जिल्हाधिकारी, गडचिरोली) यांना सदस्य सचिव, विदर्भ वैधानिक विकास मंडळ, नागपूर म्हणून नियुक्त केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test