Type Here to Get Search Results !

🛑पिगोंडे ग्रामपंचायत हद्दीत आगामी सण कोरोनाच्या नियमावलीचे पालन करुन साजरे करा 🛑नागोठणे पोलिस ठाण्याच्या वतीने सहाय्यक फौजदार प्रमोद कदम यांचे आवाहन


🛑पिगोंडे ग्रामपंचायत हद्दीत आगामी सण कोरोनाच्या नियमावलीचे पालन करुन साजरे करा 

🛑नागोठणे पोलिस ठाण्याच्या वतीने सहाय्यक फौजदार प्रमोद कदम यांचे आवाहन

 *रायगड वेध नागोठणे अनिल पवार
नागोठणे : जागतिक महामारी ठरलेल्या कोरोना विषाणूच्या रुग्ण संख्येत गेल्यावर्षी गणेशोत्सवानंतर मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले होते. यावर्षी देखील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पुर्णपणे थांबलेला नसून याबरोबरच आता अधिक घातक असणाऱ्या डेल्टा प्लसचा फैलाव काही अंशी होताना दिसत आहे. त्यामुळेच कोरोना विषाणूच्या तसेच नवीन प्रकारच्या या डेल्टा प्लसच्या पार्श्वभूमीवर आगामी गोकुलाष्टमी व गणेशोत्सव सण पिगोंडे ग्रामपंचायत हद्दितील सर्व नागरिकांनी शासनाने ठरवून दिलेले कोविड १९ च्या नियमांचे काटेकोर पालन करुन साजरे करावेत असे आवाहन नागोठणे पोलिस ठाण्याच्या वतीने वेलशेत पोलिस दुरक्षेत्र मधील सहाय्यक फौजदार प्रमोद कदम यांनी केले.  
नागोठणे पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पिगोंडे ग्रामपंचायत कार्यालयात शनिवार दि.२८ रोजी संध्याकाळी पाच वाजता संपन्न झालेल्या बैठकीत ते उपस्थित नागरिकांना मार्गदर्शनपर बोलत होते. नागोठणे पोलीस ठाण्याच्या वेलशेत दुरक्षेत्रच्या वतीने सहाय्यक फौजदार प्रमोद कदम यांनी यावेळी वेलशेत व आंबेघर येथील ग्रामस्थांना गोविंदा आणि गणेशोत्सव साजरा करताना कोरोना - डेल्टा प्लस या प्राणघातक विषाणूचा सर्वत्र झपाट्याने वाढणारा प्रादुर्भाव तसेच फैलाव, याच पार्श्वभूमीवर नागरिकांनी पालन करावयाचे शासकीय आदेश, नियमावली याबाबत कदम यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. येणाऱ्या काळात गणेश उत्सव साजरा केला जात असताना प्रामुख्याने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. याचबरोबर सोशल डिस्टंसिंग पाळणे, तोंडाला मास्क लावणे, जास्तीत जास्त सॅनेटायझर चा वापर करावा या विषयी महत्वपूर्ण सुचना त्यांनी यावेळी उपस्थित नागरिकांना दिल्या. याशिवाय श्री गणेशाची मूर्ती चार फुटांपेक्षा जास्त असू नये असेही त्यांनी आवर्जून सांगितले. आपल्या सण उत्सवात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले. या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक सहाय्यक फौजदार प्रमोद कदम, पिगोडे ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष जनार्दन कोळी, उपसरपंच नाना बडे, सदस्य सखाराम घासे, सौ. कांचन ताई माळी आदींसह पिगोंडे ग्रामपंचायत हद्दीतील वेलशेत व आंबेघर गावातील प्रतिष्ठित नागरिक यावेळेस उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुंडलिक ताडकर यांनी केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test