Type Here to Get Search Results !

🛑द.ग.तटकरे महाविद्यालयात करियर गाईडन्स विषयावर ऑनलाइन कार्यशाळेचे आयोजन.


🛑द.ग.तटकरे महाविद्यालयात करियर गाईडन्स विषयावर ऑनलाइन कार्यशाळेचे आयोजन.
 
रायगड वेध तळा श्रीकांत नांदगावकर

द.ग.तटकरे कला व वाणिज्य महाविद्यालयात ‘करियर गाईडन्स’ या विषयावर एक दिवसीय ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन दि.२७ ऑगस्ट रोजी करण्यात आले होते.द.ग.तटकरे कला व वाणिज्य महाविद्यालय मधील आयक्यूएसी,करिअर गाईडन्स सेल आणि कॉम्प्युटर ट्रेनिंग सेंटर यांच्या सयुक्त विद्यमाने 'जॉब ओरिएंटेड कोर्सेससाठी करिअर मार्गदर्शन' एक दिवसीय ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.या कार्यशाळेमध्ये प्रमुख मागर्दर्शक म्हणून श्री.सिद्धेश गोसावी, विपणन सल्लागार,(एमकेसीएल) हे लाभले होते.त्यांनी विद्यार्थ्यांना सद्यकाळात पदवी शिक्षणाबरोबरच संगणकाचे कोर्सची आवश्यकता आहे.यासाठी त्यानीं खाजगी क्षेत्रात व सरकारी क्षेत्रात नोकरीसाठी अकाउंटिंग सॉफ्टवेअर,डिजिटल आर्ट,फोटोशॉप,वेब डिझाइन, हार्डवेअर नेटवर्किंग,प्रोग्रामिंग, बँकिंग,मोबाईल अप डेव्हलपमेंट, सायबर सिक्युरिटी, मॅनेजमेंट याकोर्स विषयीची सविस्तर माहिती सांगतली.तसेच हे कोर्स केल्यानंतर कोणत्या क्षेत्रातन्यु कलर जॉब अपोर्च्युनिटी उपलब्ध आहेत या विषयीही मागर्दर्शन केले.
 या कार्यशाळेचे अध्यक्ष चेअरमन किरण देशमुख यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांना ज्या ज्या क्षेत्रामध्ये नोकरीची संधी उपलब्ध आहे असे वेगवेगळे कोर्स विद्यार्थ्यांनी करणे गरजेचे आहे असे सांगितले. विद्यार्थ्यांना मागर्दर्शन करतांना त्यांनी सांगितले की, तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाने संगणक प्रशिक्षण केंद्र सुरु केल्यामुळे तळा महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या १००० विद्यार्थ्यांना आजपर्यंत नोकरी मिळालेली आहे.हे विद्यार्थी मला जेव्हा जेंव्हा भेटतात त्यावेळी ते याविषयी समाधान व्यक्त करतात.
 या कार्यशाळेच्या समन्वयक प्रा.सौ.तृप्ती थोरात यांनी कार्यशाळेचे सूत्रसंचालन केले तर प्रास्ताविक डॉ.नानासाहेब यादव यांनी केले.कार्यशाळेच्या सह समन्वयक सौ.संदिका बारटक्के यांनी प्रमुख पाहुण्याचा परिचय करून दिला.या कार्यशाळेत ३५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.कार्यशाळेचे आभार समन्वयक डॉ.दिवाकर कदम यांनी मानले.या कार्यशाळेस तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत रोडे, उपाध्यक्ष पुरुषोत्तम मुळे, सचिव मंगेश देशमुख, खजिनदार कौस्तुभ धामणकर , महाविद्यालयीन विकास समितीचे चेअरमन डॉ. श्रीनिवास वेदक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.कैलास निंबाळकर यांनी सदिच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test