🛑पुरुषोत्तम मुळे यांची ओबीसी महासंघाच्या कोकण कार्याध्यक्ष पदी नियुक्ती
रायगड वेध तळा प्रतिनिधी श्रीकांत नांदगावकर
तळा शहरातील पुरुषोत्तम मुळे यांची राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या कोकण विभाग कार्याध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली.राष्ट्रीय ओबीसी महासंघ ही संघटना ओबीसींच्या न्याय व हक्कासाठी लढणारी संघटना असून ओबीसींच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारी संघटना आहे.पुरुषोत्तम मुळे हे महासंघाची घटना व ध्येय धोरणांना अधिन राहून ओबीसीतील विविध जाती जमातीतील कार्यकर्ते व संस्थांना सदस्य करून घेऊन सर्व समावेशक प्रभावी संघटना बांधणी करून ओबीसी समाजाच्या हिताची व त्यांच्या विकासाची कामे करतील या हेतूने संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.पी.बी.कुंभार यांनी त्यांच्यावर कोकण विभाग कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे.यावेळी माझ्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी मी निश्चितच यशस्वीपणे पार पाडेन तसेच संघटनेच्या माध्यमातून ओबीसी समाजातील घटकांना न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे नवनिर्वाचित कार्याध्यक्ष पुरुषोत्तम मुळे यांनी सांगितले.त्यांच्या निवडीमुळे अनेक मान्यवरांकडून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.