Type Here to Get Search Results !

🛑महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्ट शाखा म्हसळा तर्फे महाड शहरातील पूरग्रस्त समाज बांधवांना आर्थिक मदत


🛑महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्ट शाखा म्हसळा तर्फे महाड शहरातील पूरग्रस्त समाज बांधवांना आर्थिक मदत

रायगड वेध म्हसळा प्रतिनिधी श्रीकांत बिरवाडकर

महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्ट मुंबई, शाखा-म्हसळा व मुंबई निवासी यांच्या संयुक्त विद्यमाने महाड येथील पूरग्रस्त समाज बांधवांना आर्थिकदृष्ट्या मदतीचे वाटप करण्यात आली. माहे जुलै महिन्यात महाड शहरात आणि तलीये सारख्या अनेक गावांत पुरामुळे मोठे संकट ओढवले होते.पुरात अनेक जणांचा सुखाचा संसार काही क्षणातच वाहुन गेला आणि होत्याचे नव्हते झाले असे असले तरी संकटात लोकांना सावरण्यासाठी शासनासह अनेक स्वयंसेवी संस्था,सामाजिक संघटना,सर्वच राजकीय संघटना आणि त्यांचे लोकप्रतिनिधी,दानशूर मंडळी यांचे मदतीचे हात त्यांच्या मदतीला धावले. त्यांनी वेळीच केलेली मदत आणि सहकार्य कधीच विसरता येणार नाही.मदतगारांचे मानावेत तेवढे आभार आणि त्यांना द्यावेत तेवढे धन्यवाद कमीच होतील.आजूनही महाड आणि परिसरातील बाधीत गावांत अनेक दानशूर मंडळी,लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संस्था वेगवेगळ्या प्रकारची मदत करीत आहेत अशाच पद्धतीने खारीचा वाटा का होईना महाड शहरातील यादव गवळी समाज बांधवांना महाराष्ट्र यादव चॅरिटी ट्रस्ट शाखा म्हसळा तालुक्याचे वतीने नारळी पौर्णिमा उत्सवाचे औचित्य साधून 30 कुटुंबातील सदस्यांना यथाशक्ती रोख रकमेची मदत केली. 
महाड-पोलादपूर गवळी समाज मंडळाचे सामाजिक सभागृहात संपन्न कार्यक्रमाला ट्रस्टचे माजी अध्यक्ष तथा रायगड जिल्हा गवळी समाज अध्यक्ष लक्ष्मण कांबळे,महाडचे माजी नगराध्यक्ष चंद्रहास मिरगल,म्हसळा तालुका ट्रस्टचे शाखा अध्यक्ष रामदास रिकामे,म्हसळा तालुका शाखा मुंबई कार्याध्यक्ष शांताराम गायकर, यादव समाज उन्नती संस्था म्हसळा अध्यक्ष अशोक काते, सचिव- सुजित काते,सचिव दिपक धुमाळ,यादव समाज उन्नती संस्था खजिनदार-मोहन किळजे,महाड-पोलादपूर गवळी समाज सचिव - अनंत महाडिक,खजिनदार-मनोहर महाडिक आणि लाभार्थी उपस्थित होते. या वेळी महाड गवळी समाज मंडळ सचिव अनंत महाडिक,खजिनदार मनोहर महाडिक यांनी मनोगत व्यक्त करताना म्हसळा तालुक्यातील समाज बांधवांनी या वेळी केलेली आर्थिक मदत ही मोलाचीच आहे.पुर कालावधीत खासदार सुनिल तटकरे,पालकमंत्री आदिती तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरे यांनी महाड वासियांना सर्वच प्रकारे केलेली मदत कायमस्वरूपी स्मरणात राहील अशी आहे. महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टचे शिखर अध्यक्ष बाबा धुमाळ यांनीही महाड येथील बधितांना आर्थिक मदत केल्याचे सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test