Type Here to Get Search Results !

🛑गॅस सिलेंडर दरवाढी विरोधात तळा शेकापचे निवेदन


🛑गॅस सिलेंडर दरवाढी विरोधात तळा शेकापचे निवेदन

रायगड वेध तळा श्रीकांत नांदगावकर

 गॅस सिलेंडर दर वाढीविरोधात तळा शेकाप तर्फे तळा पोलीस ठाणे व तहसील कार्यालय येथे निवेदन देण्यात आले.शासनाने गॅस,सिलेंडर,डिझेल पेट्रोल यांसह जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत सातत्याने वाढ केली आहे.त्यामुळे राज्यातील जनतेला मोठ्या आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.कोविड१९ च्या प्रादुर्भावामुळे अनेकांचा रोजगार बंद पडलेला आहे यामुळे अनेकजण बेरोजगार झाले असून कुटुंबातील कमावती व्यक्ती कोरोनाचा बळी देखील ठरली आहे.त्यातच चक्रीवादळे,अतिवृष्टी, महापूर यामुळे संसार उघड्यावर पडला आहे.असे असताना शासनाकडून गॅस सिलेंडरच्या किमती कमी न होता त्यात सातत्याने वाढ करण्यात येत आहे.तसेच शासनाकडून गॅस सिलेंडर वर देण्यात येणारी सबसिडी देखील बंद करण्यात आली आहे.सिलेंडर ची किंमत तब्बल ९०० रुपयांवर जाऊन पोहचली असल्याने दर महिन्याला ग्रामीण भागातील जनतेला हा खर्च परवडणारा नाही.यांसह पेट्रोल, डिझेल व जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत झालेल्या भरमसाठ वाढीमुळे नागरिकांना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शासनाने गॅस सिलेंडर यांसह जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कमी कराव्यात यासाठी तळा शेकाप तर्फे प्रशासनाला निवेदन देण्यात आले. याप्रसंगी तालुका चिटणीस धनराज गायकवाड,युवा नेते लहू चव्हाण,ज्ञानेश्वर भोईर व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test