Type Here to Get Search Results !

🛑शासना मार्फत गाववाडी वस्तीवर मंजूर केलेली विकासकामे ग्रामस्थांना विश्वासात घेवुन योग्य दर्जाची करावीत - पालकमंत्री आदिती तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे यांचा ठेकेदारांना इशारा


🛑शासना मार्फत गाववाडी वस्तीवर मंजूर केलेली विकासकामे ग्रामस्थांना विश्वासात घेवुन योग्य दर्जाची करावीत - पालकमंत्री आदिती तटकरे

🛑● पालकमंत्री आदिती तटकरे यांचा ठेकेदारांना इशारा

🛑● पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन सोहळे संपन्न 

रायगड वेध म्हसळा प्रतिनिधी श्रीकांत बिरवाडकर

    म्हसळा तालुक्यातील विकास कामांना निधीची कमतरता पडु देणार नाही मात्र शासना मार्फत गाववाडी वस्तीतीवर आमच्या मार्फत मंजूर करण्यात आलेली विकास कामे ग्रामस्थांना विश्वासात घेवुन बांधकाम झालेली व करण्यात येणार असलेली कामे लोकप्रतिनिधींना आणि लोकांना आवडतील अशा योग्य दर्जाची करावीत असे प्रतिपादन पालकमंत्री आदिती तटकरे यांनी सोमवारी मौजे वरवठणे येथे गाव अंतर्गत डांबरीकरण रस्ता व साकव बांधकाम भूमिपूजन कार्यक्रमात व्यक्त केले. 
कामे पूर्ण झाल्यानंतर अनेकदा त्या कामाच्या तक्रारी केल्या जातात त्या होऊ नयेत यासाठी ते आधीच दर्जेदारपणे व्हायला पाहिजेत असा अप्रत्यक्ष इशाराच पालकमंत्री आदिती तटकरे यांनी उपस्थित पक्ष कार्यकर्त्यांना आणि संबंधित ठेकेदाराना दिला. या वेळी त्यांनी अधिकपणे सांगताना खासदार सुनिल तटकरे यांच्या कामाची पध्दती पहाता भविष्यात लोकपयोगी ठरतील अशा मोठया निधीची कामे गाववाडीत मंजूर करण्यात आली आहेत त्याच धर्तीवर आमचेही प्रयत्न असून प्रदिर्घ कालावधी नंतर तालुक्यात अनेक गावांत लहान मोठया विकास कामांना चालना देण्यात आली आहे. तालुक्यात अनेक गावाचे विकास कामांना मंजुरी देण्यात आली आहे तर अनेक कामे प्रास्तविक आहेत. विकास कामे करतानाच विज, पाणी, आरोग्य आणि शिक्षण या बाबींच्या विकासावर अधिक भर देण्यात आली आहे. म्हसळा तालुक्यात रुग्णसेवेसाठी आता पर्यंत चार रुग्णवाहिका मंजुर करण्यात येवुन त्यांचे लोकार्पण करण्यात आले. म्हसळा ग्रामीण रुग्णालयात व प्राथमिक आरोग्य केंद्रात माझे आमदार निधीतून आरोग्यसुविधे करिता मुबलक साहित्य पुरवठा करण्यात आला असल्याचे सांगितले. पालकमंत्री आदिती तटकरे यांचे म्हसळा तालुका दौऱ्यात त्यांचे शुभ हस्ते मेंदडी व म्हसळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नवीन रुग्णवाहिका लोकपर्ण सोहळा, पनवेल येथील संस्थापक डॉ.हळदीपुरकर यांचे लक्ष्मी चॅरिटेबल आय इन्स्टिट्यूटच्या म्हसळा शाखेचे उदघाटन डॉ.महेश मेहता यांचे क्लिनिक मध्ये करण्यात आले, साळवींडे देवळाचीवाडी येथे रस्ता उदघाटन, साळवींडे ताडाची वाडी संरक्षण भिंत उदघाटन, वरवठणे मोहल्ला डांबरीकरण रस्ता भूमीपूजन, पेडांबे येथे साकव बांधकामाचे भूमिपून आणि तोंडसुरे येथील अंगणवाडी इमारतीचे उदघाटन पालकमंत्री आदिती तटकरे यांचे हस्ते करण्यात आले.    
    या वेळी त्यांचे समावेत राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते हबीब फकीह, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अलीशेठ कौचाली,जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती बबन मनवे, जि.प.सदस्या धनश्री पाटील, सभापती छायाताई म्हात्रे,उपसभापती संदीप चाचले,प.स.सदस्य मधुकर गायकर,माजी सभापती उज्वला सावंत, माजी सभापती नाझीम हसवारे, महिला अध्यक्षा रेश्मा काणसे, प्रांतअधिकारी अमित शेटगे, तहसीलदार शरद गोसावी, जेष्ठ नेते अंकुश खडस, रियाजभाई फकीह, वरवठणे सरपंच इशरत फकीह,शाहिद उकये, लक्ष्मण कांबळे,लहूशेट म्हात्रे,संतोष नाना सावंत,गण अध्यक्ष सतीश शिगवण,अनिल बसवत,जहुर काझी, प्रकाश गानेकर, रामदास रिकामे,किरण पालांडे,महेश घोले,साळवींडे सरपंच सोनल घोले,शेखर खोत,सुजित काते, गजानन जंगम,गजानन पाखड,स्वप्नील चांदोरकर,महादेव तावडे,रामशेठ पार्रदुले, बबन पवार आदी मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test