Type Here to Get Search Results !

🛑पेणमध्ये आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या हस्ते शिवसेना जन संपर्क कर्यालयाचे उद्घाटन


🛑पेणमध्ये आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या हस्ते शिवसेना जन संपर्क कर्यालयाचे उद्घाटन

🛑महाविकास आघाडी कायम- आमदार महेंद्रशेठ दळवी

रायगड वेध पेण प्रतिनिधी प्रशांत पोतदार

रायगड शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा अलिबाग मतदार संघाचे आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्ह्यास पेण तलुक्यात शिवसेना पक्षाची ताकद वाढत आहे आज सोमवार रोजी पेण शहरात शिवसेना महिला आघाडी पेण शहर सौ.अंजली वैभव जोगळेकर यांच्या जन संपर्क कार्यालयाचे उद्घाटन जिल्हाप्रमुख तथा आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बोलताना आमदार महेंद्रशेठ दळवी यांनी सांगितले कि या जनसंपर्क कार्यलयाच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक तळागाळातील लोकांच्या समस्या सुटल्या पाहिजे असे काम करा.तसेच शिवसेना पक्ष वाढीसाठी जन संपर्क कार्यालयातुन प्रयत्न करा यापुढिल निवडणूकीत महाराष्ट्रातील महाविकास आघाडी कायम राहणार असल्याचे सूतोवाच यावेळी आमदार महेंद्रशेठ दळवी यांनी केले
यावेळी माजी जिल्हा प्रमुख विष्णुभाई पाटिल,माजी जिल्हा परिषद सद्स्य राजू साबळे,अलिबाग तालुका प्रमुख राजाभाई केणी,वाहतूकसेना जिल्हाध्यक्ष दिलीप पाटिल,वैभव जोगळेकर,अंजली जोगळेकर,स्वरूप घोसाळकर आदि पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test