Type Here to Get Search Results !

🛑गणपती कारखान्यात मूर्तिकारांची लगबग.मूर्ती घडविण्यात कारागीर मग्न


🛑गणपती कारखान्यात मूर्तिकारांची लगबग.
मूर्ती घडविण्यात कारागीर मग्न

रायगड वेध अभिजीत मुकादम

 अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री गणेशाचा गणेशोत्सव अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला असल्याने गणपती कारखान्यात मूर्तिकारांची लगबग सुरू झाली आहे.तळा तालुक्यातील गणपती कारखान्यांमध्ये मूर्ती घडविण्यात कारागीर मग्न झाले आहेत. बुद्धीची देवता असलेल्या श्री गणेशाचा गणेशोत्सव कोकणात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.पाच दिवस आरती, महाप्रसाद, भजन, नाच यामुळे एकप्रकारे भक्तिमय वातावरण निर्माण होते. गतवर्षी उत्साहाला कोरोना रूपी जागतिक महामारी ग्रहण लागले याहीवर्षी कोरोनाचे संकट टळले नाही आहे. तरीही बप्पाला घरी आणण्याची हौस आणि श्रद्धा काही वेगळीच असते. त्यामुळे गणेशोत्सवासाठी नागरिक लवकरच तयारीला लागत असून जवळपास एक महिना आधीपासूनच कारखान्यात आपल्याला हवी असलेल्या गणेश मूर्तीची ऑर्डर देऊन ठेवतात.याबाबत बोर्ली पंचतन येथील पारस गणेश कला मंदिर चे मालक दिनेश दिवेकर यांनी सांगितले की बोर्ली पंचतन तसेच भरडखोल, व इतर गावांतील काही नागरिक अगोदरच आपल्याला हवी असलेल्या मूर्तीची ऑर्डर देतात. दरवर्षी सुमारे ६० गणेश मूर्तींची ऑर्डर येत असून त्यामध्ये सर्वच  शाडूच्या मूर्तींचा समावेश आहे. पेण येथून कच्चा माल आणावा लागत असून पेट्रोल डिझेल च्या वाढत्या किमतींमुळे गाडीभाड्यात तसेच मूर्त्यांच्या किमतीत देखील वाढ झाली आहे.पावसाने विश्रांती घेतली असल्यामुळे सर्व मूर्त्यांना सुखावून बॉडी कलर मारण्यात आले आहे. तसेच रंगकामाला सुरुवात होऊन अंतिम टप्प्यात आली आहे. हल्लीच्या वाढत्या महागाईत कारखाने चालवणे परवडत नसले तरी आमचा कारखाना गेली १० वर्षे जुना असून आत्ताची माझी दुसरी पिढी म्हणजे माझा लहान मुलगा पारस हा ही आवडीने हे काम करीत आहे. त्यामुळे परवडत नसले तरी मी हौसेने आणि समाधानाने हा वारसा पुढे चालवत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test