Type Here to Get Search Results !

🛑गणेशोत्सवापूर्वी रस्त्यावरील खड्डे भरण्यात यावे.राष्ट्रवादी नगरसेवकांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन.


🛑गणेशोत्सवापूर्वी रस्त्यावरील खड्डे भरण्यात यावे.
राष्ट्रवादी नगरसेवकांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन.

रायगड वेध तळा श्रीकांत नांदगावकर

 गणेशोत्सवापूर्वी तळा शहरातील खड्डे भरण्यात यावे तसेच कित्येक दिवसांपासून बंद असलेले पथदिवे देखील सुरू करण्यात यावे यासाठी राष्ट्रवादी च्या नगरसेवकांकडून मुख्याधिकारी माधुरी मडके यांना निवेदन देण्यात आले.शहरातील बाजारपेठेत मुख्य रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत.शहरात खेड्यापाड्यातील नागरिक विविध कामानिमित्त येत असल्याने या खड्यांचा त्रास शहरवासीयांबरोबरच संपूर्ण तळा तालुक्यातील नागरिकांना होत आहे.तसेच नगरपंचायत हद्दीतील बऱ्याच ठिकाणचे पथदिवे अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत असल्याने व सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने रात्री अपरात्री अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.गणेशोत्सवासाठी मोठ्या प्रमाणावर चाकरमानी गावाकडे परतत असतात त्यांना देखील या सर्व समस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे त्यामुळे गणेशोत्सवपूर्वी शहरातील सर्व खड्डे भरण्यात यावेत तसेच नगरपंचायत हद्दीतील सर्व पथदिवे सुरू करण्याची कार्यवाही करावी यासाठी मुख्याधिकारी माधुरी मडके यांना राष्ट्रवादी काँग्रेस च्या नगरसेवकांनी निवेदन दिले. याप्रसंगी गटनेते मंगेश शिगवण,चंद्रकांत रोडे,प्रकाश गायकवाड,शहर अध्यक्ष महेंद्र कजबजे, राकेश नांदगावकर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test