Type Here to Get Search Results !

🛑सर्वांच्या प्रामाणिक मेहनतीने आपल्या रुग्णालयाचे नाव उंचावले - डॉ मधुकर ढवळे


🛑सर्वांच्या प्रामाणिक मेहनतीने आपल्या रुग्णालयाचे नाव उंचावले - डॉ मधुकर ढवळे 

रायगड वेध श्रीवर्धन प्रतिनिधी स्वरा पुलेकर

उपजिल्हा रुग्णालय श्रीवर्धन येथे देशाचा 75 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाला. या वेळी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मधुकर ढवळे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. या वेळी मार्गदर्शन करताना डॉ. ढवळे म्हणाले की, आपल्या उपजिल्हा रुग्णालयात कोविड रुग्णांची घेतलेली काळजी व कोरोना रुग्ण बरे होण्याचे आपल्या येथील प्रमाण पाहून जिल्ह्यातील इतर तालूक्यातील कोरोना बाधित रुग्ण येथे उपचार घेण्यासाठी येत होते व अजूनही येत आहेत, हीच आपल्या चांगल्या सेवेची पोच पावती आहे, यावेळी व्यासपीठावर वैदयकिय अधिकारी डॉ. महेंद्र भरणे, डॉ. सागर, नेत्र चिकित्सा अधिकारी सलीम ढालाईत आदी उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ ढवळे म्हणाले की पालकमंत्री अदिती मॅडम, खासदार सुनीलजी तटकरे साहेब, आमदार अनिकेतभाई यांच्या पाठपुराव्यामुळे आपल्याला साधने उपलब्ध होत गेली, रुग्णालयाला कुठलीही अडचण भासली नाही. सफाई कर्मचाऱ्यापासून एक्सरे विभाग, प्रयोगशाळा विभाग, कक्षसेवक, अधिपरिचारिका, सर्व डॉक्टर्स रुग्णालयातील सर्व विभागातील कर्मचारी,  ऍम्ब्युलन्स चालक यांचा मोठा हातभार या महामारीत लाभल्याने या रुग्णालयाचे नावं उंचावले आहे. अशाच प्रकारे रुग्ण सेवा टीम वर्क मध्ये देण्याची जवाबदारी वाढली आहे. असे सांगून सर्वाना शुभेच्छा दिल्या. या वेळी शासनाच्या आरोग्य विभागाकडून आलेल्या प्रशस्ती पत्राचे वैैद्यकीय अधीक्षक डॉ. मधुकर ढवळे यांच्या हस्ते डॉ. महेंद्र भरणे यांच्या समवेत डॉक्टर्स, अधिपरिचारिका, फार्मासिस्ट, एक्सरे टेक्निशियन, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कक्षसेवक, ऑफिस कर्मचारी, रुग्णायातील सर्व विभागातील कर्मचारी, ऍम्ब्युलन्स चालक, सफाई कर्मचारी आदींना  वितरित करण्यात आले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test