Type Here to Get Search Results !

🛑तळा तालुका हिंदू संघर्ष समितीची स्थापना


🛑तळा तालुका हिंदू संघर्ष समितीची स्थापना

रायगड वेध तळा प्रतिनिधी श्रीकांत नांदगावकर

 तळा शहरातील कुणबी सभागृह येथे झालेल्या बैठकीत नुकतीच तळा तालुका हिंदू संघर्ष समिती ची स्थापना करण्यात आली. या संघटनेच्या अध्यक्ष पदी प्रदूम्न ठसाळ उपाध्यक्ष पदी प्रशांत नांदगावकर,नामदेव काप,सचिव पदी महेंद्र कजबजे,कमलाकर चोरगे,खजिनदार पदी वसंत पोळेकर व नाना दळवी यांची निवड करण्यात आली आहे.हिंदूंवर होणारे अन्याय व अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी या समितीची स्थापना करण्यात आली आहे.शुक्रवार दि.१३ रोजी तालुक्यातील कळमशेत येथील फार्महाऊस वर झालेल्या गोहत्येच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण तळा तालुक्यातील सर्व गावांची बैठक शहरातील कुणबी सभागृहात पार पडली. या बैठकीत वरील समितीची स्थापना करून पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. तसेच गोहत्या करणाऱ्या आरोपींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी यासाठी समितीकडून तळा पोलीस ठाणे येथे निवेदन देण्यात आले.या प्रसंगी तालुक्यातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test