🛑अकरावी प्रवेशासाठीची सीईटी रद्द, उच्च न्यायालयाचा निर्णय
टिम रायगड वेध
अकरावी प्रवेशासाठी राज्य शासनाने प्रस्तावित केलेली सीईटी परीक्षा उच्च न्यायालयाने रद्द केली आहे.दहावीच्या मूल्यांकनाच्या आधारे अकरावीला प्रवेश, राज्य शिक्षण मंडळाला दणका बसला आहे.
दहावीची परीक्षा रद्द झाल्याने अकरावीचे प्रवेश गुणवत्ता यादीनुसार व्हावेत यासाठी राज्य सरकारने सीईटी परीक्षेचा पर्याय विद्यार्थ्यांना दिला होता. ही सीईटी परीक्षा जुलै अखेर किंवा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होईल असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले होते.दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे जाहीर करण्यात आला आहे.सीईटी परीक्षा वैकल्पिक होती. सीईटीला प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी मात्र प्राधान्य देण्यात येईल. त्यामुळे स्पर्धात्मक महाविद्यालयात प्रवेश घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांना सीईटीच्या माध्यमातून प्रवेशाची जागा सुरक्षित करता येणार होती.मात्र शासनाने सीईटी रद्द करून राज्य शासनाच्या निर्णयाला रद्दबादल ठरवले आहे.