Type Here to Get Search Results !

🛑विज ग्राहकांच्या हक्कासाठी म्हसळा तालुका शिवसेना संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात


🛑विज ग्राहकांच्या हक्कासाठी म्हसळा तालुका शिवसेना संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात

◆🛑 वारेमाप विज बिल आकारून त्याची पठाणी वसुली करणाऱ्या अधिकाऱ्याच्या बदलीची मागणी.

रायगड वेध म्हसळा - श्रीकांत बिरवाडकर

म्हसळा तालुक्यात विज वितरण कंपनीची ग्राहक व्यवस्था कोलमडली आसुन विज कंपनीने आम जनतेला वेठीस धरले आहे. वारेमाप विज बिल आकारून महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीने पठाणी वसुली सुरू करून ग्राहकांना अक्षरशः नडत आहे. भरमसाठ आकारण्यात आलेले विज बिल ग्राहकांना लागलीच भरणा करण्यासाठी तगादा लावला आहे. वेळीच विज बिल भरणा केला नाही तर विज कनेक्शन तोडण्याची पठाणी भाषा म्हसळा विज वितरण कंपनीचे अधिकारी पालवे हे ग्राहकांना करीत आहेत त्यांची अरेरावी खपवुन घेतली जाणार नाही. अधिकारी पालवे यांची संबंधीत वरिष्ठ अधिकारी वर्गाने तातडीने बदली करावी अशी जाहीर मागणी म्हसळा तालुका शिवसेना संघटनेने तहसीलदार म्हसळा आणि पोलीस ठाणे निरीक्षक म्हसळा यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे. 
निवेदन सादर करताना माजी सभापती महादेव पाटील, माजी तालुका प्रमुख रविंद्र लाड, पक्ष संघटक कृष्णा म्हात्रे,शिवसेनेचे पदाधिकारी विरेंद्र सावंत,पांडुरंग सुतार,विभाग प्रमुख हेमंत नाक्ती,अनंत शेडगे,विलास खेडेकर,जय मोहिते उपस्थित होते. म्हसळा तालुक्यातील विज ग्राहकांच्या समस्या निवारण करण्यासाठी तालुका शिवसेना संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आसुन निवेदनात 1)तालुक्यातील ग्रामीण भागात बंद करण्यात आलेले पथदिवे कंपनीने सणासुदीला सुरू करावेत. 2)अनेक ग्राम पंचायत हद्दीत परवानगी न घेता विज वितरण कंपनीने विज जनित्र(ट्रान्सफर्म)व विजेचे खांब उभे करून जागेची अडवणूक केली आहे त्या बलकावलेल्या जागेचा भाड विज वितरण कंपनीने ग्राम पंचायतीकडे जमा करावा. 3)उन्हाळ्याचे दिवसात विज वितरण कंपनीच्या विजवाहक तारांमध्ये स्पार्क होऊन जंगलात वणवे लागुन अनेक शेतकऱ्यांच्या बागायती जळून खाक झाल्या होत्या त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देण्यात यावी अशी मागणी तालुका शिवसेना संघटनेने केली आहे. दिलेल्या निवेदनाची व तक्रारीची म्हसळा तालुका विज वितरण कंपनीने वेळीच दखल न घेतल्यास तीव्र जन आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test