Type Here to Get Search Results !

🛑ढोलकीच्या आवाजाने लागली गणेशोत्सवाची चाहूल.🛑गणेशोत्सवासाठी तळ्यामध्ये ढोलकी विक्रेते दाखल


🛑ढोलकीच्या आवाजाने लागली गणेशोत्सवाची चाहूल.

🛑गणेशोत्सवासाठी तळ्यामध्ये ढोलकी विक्रेते दाखल

रायगड वेध तळा श्रीकांत नांदगावकर

 कोकणात गणपतीच्या सणाला अत्यंत महत्व आहे.या गणेशोत्सवाच्या काही दिवस अगोदर शहरातून खांद्याला ढोलक्या अडकवून त्या विक्रीसाठी फिरणारे कारागीर दिसू लागतात.गाव शहरातून ढोलकी वाजवत फिरणाऱ्या या कारागिरांच्या ढोलकीचा आवाज कानावर पडला की आपोआप गणेशोत्सवाची चाहूल लागते.गणपतीच्या आरती वेळी बहुतेक घरातून ढोलकीचा सूर ऐकायला मिळतो.तो कानावर पडला की आरतीलाही रंगत भरली जाते. गणपती सणासाठी मोठी आरस,पक्वान्ने,वाद्ये बाजारात विक्रीसाठी येत असतात.याचप्रमाणे ढोलकी विक्रीलाही तळ्यामध्ये सुरुवात झाली आहे.मोकळ खोड,शेळीचे चामडे,चाव्या, पॉलिश,शाई आणि दोरी व वादी आदी साहित्य वापरून ढोलकीची बांधणी केली जाते.ढोलकी विक्रेते दहा ते पंधरा ढोलक्या खांद्याला अडकवून तळा बाजारपेठेत विकताना दिसत आहेत.या ढोलक्या ३०० रुपयांपासून ८०० रुपयांपर्यंत विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. गणेशोत्सवात ढोलकीचा उपयोग आरती सोबतच भजनासाठी तसेच पारंपरिक गाणी वाजविण्यासाठीही होतो .त्यामुळे गणेशोत्सवात ढोलकीला मोठी मागणी असते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test