Type Here to Get Search Results !

🛑सर्व भागातील आरोग्य यंत्रणा बळकटीकरणासाठी प्रयत्न पालकमंत्री आदिती तटकरे, बोर्ली पंचतन व वाळवटी येथील १०२ रुग्णवाहिकेचे लोकार्पण


🛑सर्व भागातील आरोग्य यंत्रणा बळकटीकरणासाठी प्रयत्न पालकमंत्री आदिती तटकरे

🛑बोर्ली पंचतन व वाळवटी येथील 102 रुग्णवाहिकेचे लोकार्पण

🛑बोर्ली पंचतन आरोग्य केंद्राच्या डागडुजीसाठी 5 लाखाचा निधी

🛑बोर्ली पंचतन व वाळवटी केंद्रासाठी आरोग्य साहित्य उपलब्ध

रायगड वेध अभय पाटील

कोविड19 महामारी मध्ये आरोग्य व्यवस्था सर्वांच्या सहकार्याने बळकटीकरण करण्याचा आपला प्रयत्न असून बोर्ली पंचतन व वाळवटी आरोग्य केंद्रासाठी 102 रुग्णवाहिका उत्तम सुविधेसह उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत याशिवाय लसीकरण करण्यासाठी लस उपलब्ध करण्याच्या दृष्टीने पाठपुरावा असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री तथा श्रीवर्धन आमदार आदिती तटकरे यांनी केले, श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन येथे उपलब्ध झालेल्या 102 रुग्णवाहिकेच्या लोकार्पण प्रसंगी त्या बोलत होत्या.
    जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था बळकटी करण्याच्या उद्देशाने 14 वित्त आयोगाच्या व्याजातून उपलब्ध निधीतून बोर्ली पंचतन व वाळवटी प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी 102 रुग्णवाहिका पालकमंत्री तथा श्रीवर्धन आमदार यांच्या प्रयत्नाने उपलब्ध करून देण्यात आल्या असून या रुग्णवाहिकेचे लोकार्पण पालकमंत्री तथा श्रीवर्धन आमदार आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी महंमद मेमन, सरपंच नम्रता गाणेकर, उपसरपंच संतोष पयेर, जिल्हा परिषद सदस्या सायली तोंडलेकर, प्रगती आदवडे, माजी सभापती लाला जोशी, मीना गाणेकर, पंचायत समिती सदस्य मंगेश कोमनाक, दिवेआगर सरपंच उदय बापट, वडवली सरपंच प्रियांका नाक्ती, ग्रामपंचायत सदस्य नंदू पाटील, मन्सूर गिरे, उत्तम दिवेकर, प्रकाश तोंडलेकर, सदस्या ज्योती परकर, प्रिया पाटील, समिधा तोडणकर, सायली गाणेकर, माजी उपसरपंच मंदार तोडणकर, प्रांताधिकारी अमित शेडगे, तहसीलदार सचिन गोसावी, गटविकास अधिकारी उद्धव होळकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ दिपक पांडे, वैद्यकीय अधिकारी डॉ सूरज तडवी, डॉ तांबे, डॉ खैरनार, चिंचबादेवी देवस्थान समिती अध्यक्ष सुजित पाटील, तसेच इतर ग्रामस्थ उपस्थित होते. 
स्थानिक आमदार निधी कार्यक्रमातून बोर्ली पंचतन व वाळवटी प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी एकूण 27 बेडस, 12 स्ट्रेचर ट्रॉली, 2 फ्रीज असे साहित्य उपलब्ध करण्यात आले आहेत शिवाय बोर्ली पंचतन आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या काही भागातील डागडुजीसाठी 5 लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला असून लवकरच कामाला सुरुवात करण्यात येणार आहे तर बोर्ली पंचतन एस टी स्टॅन्ड ते प्राथमिक आरोग्य केंद्र या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी 15 लक्ष रुपयांचा निधी मंजुरीसाठी प्रस्तावित असल्याचे पालकमंत्री तटकरे यांनी सांगितले, आपल्या आपल्या मनोगताध्ये बोलताना आदिती तटकरे म्हणाल्या की, आपल्या ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था सक्षम करण्याच्या दृष्टीने शासन नक्कीच प्रयत्नशील आहे, लसीकरण वेगाने व्हावे यासाठी लस उपलब्ध करण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील असतो. असेही त्या म्हणाल्या.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test