🛑बजरंग पुनिया ने जिंकले कांस्यपदक
टिम रायगड वेध
ऑलिम्पिक स्पर्धेत पुरुषांच्या 65 किलो वजनी गटात भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि कझाकिस्तानच्या दाऊलेत नियाझबेकोव यांच्यात ब्राँझ पदकासाठी लढत झाली. सुरुवातीपासून आक्रमक खेळ करत बजरंग पुनियाने ब्राँझ पदकावर नाव कोरले. त्याने 8-0 अशा फरकाने एकतर्फी विजय नोंदवला. सुवर्ण पदकाचा प्रबळ दावेदार असलेल्या बजरंगला सेमीफायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. या पराभवातून सावरुन त्याने अखेर ब्राँझ पदकासह भारताच्या खात्यात आणखी एका पदकाची भर घातली.
बजरंगने सुरुवातीपासूनच मॅचवर पकड मजबूत केली होती. प्रतिस्पर्ध्याला त्याने कोणतीही संधी दिली नाही. बजरंगने दौलतला मॅचमध्ये आघाडी घेऊ दिली नाही. त्याने 8-0 अशा फरकाने दौलतचा पराभव केला. बजरंग याच्याकडून देशाला सुवर्ण पदकाची अपेक्षा होती. त्याची खेळीही त्याला साजेशीच होती. पण, सेमीफायनलमध्ये इराणच्या हाजी अलीएवने त्याला चितपट केले. मॅच एकतर्फी झाली होती. पण, त्याने ब्राँझ पदक मिळवून देशाचा गौरव वाढवला आहे.