Type Here to Get Search Results !

🛑लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई, मुरूड तहसीलदार गमन गावित लाच घेताना रंगेहाथ


🛑लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई, मुरूड तहसीलदार गमन गावित लाच घेताना रंगेहाथ

टिम रायगड वेध

 कुळ वहिवाट कायद्याच्या जमिन फेरफार करण्यासंदर्भात 15 हजारांची लाच मुरुड तहसिलदार गमन गावीत यांच्यासह दोन कर्मचार्‍यांना नवी मुंबई येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडल्याने खळबळ उडाली आहे आपल्या जमीनीच्या विक्रीसाठी त्यावर असलेले कुळ वहिवाटीचे 32 ग प्रमाणपत्रासाठी मुरुड तहसिलदार तथा शेतजमिन न्यायधिकार प्राधिकरणकडे मागणी करण्यात आली होती. त्यासाठी तक्रारदाराकडे मुरुड तहसिलदार गमन गावीत यांनी 15 हजार रुपयांची लाच मागितली. याबाबत तक्रारदाराने थेट नवीमुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधत तक्रार केली. त्यानुसार या तक्रारीची खातरजमा करुन लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नवी मुंबईचे पोलिस निरीक्षक शिवराज बेंद्रे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सापळा रचला. बुधवार दि. 11 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 च्या दरम्यान तक्रारदाराकडून 15 हजार रुपयांची लाच घेताना या पथकाने तहसिलदार गमन गावीत यांच्यासह कर्मचार्‍यांना रंगेहाथ पकडले. सदर प्रकरणाबाबत गुन्हा नोंदविण्याचे काम उशिरापर्यंत सुुरु होते. लाचखोरीच्या अशा विविध घटना समाजाची चिंता वाढवित आहेत. नुकतेच नाशिकच्या माध्यमिक शिक्षण अधिकारी वैशाली वीर यांचे लाच प्रकरण व त्यांच्या कडे सापडलेले सांपत्तिक घबाड या साऱ्या घटना समाजाला अंतर्मुख करणा-या आहेत. भ्रष्टाचार मुक्त प्रशासना ऐवजी भ्रष्टाचाराचे कुरण असा प्रश्न सर्वसामान्य माणसाला पडला आहे. कुठेतरी  लाचखोरीला आळा घालणे अत्यंत गरजेचे बनले आहे. तरच सामान्य माणसाची काम चांगल्याप्रकारे होताना दिसतील.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test