Type Here to Get Search Results !

🛑तळा येथे ७५ वा स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा


🛑तळा येथे ७५ वा स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा

रायगड वेध तळा प्रतिनिधी श्रीकांत नांदगावकर

 तळा तालुक्यात ७५ वा स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.शहरातील नगरपंचायत प्रांगणात मुख्याधिकारी माधुरी मडके यांच्या हस्ते तर तहसीलदार कार्यालयासमोरील पटांगणात तहसीलदार ए.एम.कनशेट्टी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.ध्वजारोहणानंतर तहसीलदार यांच्या दालनात झालेल्या मान्यवरांच्या बैठकीत अतिवृष्टीमुळे, दरड कोसळल्यामुळे तसेच महापुरात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.तसेच कोरोना काळात विशेष कामगिरी बजावलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ अमोल बिरवाटकर, प्राची घोसाळकर तसेच आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला.तसेच तळा तालुक्यात कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली असली तरीही कोरोना संबंधित नियमांचे पालन करण्याचे आवाहन तहसीलदार कनशेट्टी यांनी नागरिकांना केले.याप्रसंगी तालुक्यातील सर्वपक्षीय नेते,शासकीय अधिकारी,पोलीस प्रशासन व नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test