🛑श्री मोहनलाल सोनी विद्यालय व श्री नानासाहेब कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालय, फातिमाबीबी उस्मान मुर्तुजा इंग्लिश मिडीयम स्कूल बोर्ली पंचतन येथे ७५ वा स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा
रायगड वेध अभय पाटील
जनता शिक्षण संस्था बोर्ली पंचतनच्या श्री मोहनलाल सोनी विद्यालयात ७५ वा स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रशालेच्या प्रांगणात जनता शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष सुकूमार तोंडलेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी जनता शिक्षण संस्थेचे विश्वस्त महंमदभाई मेमन, जनता शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष नंदकुमार पाटील, सचिव चंद्रकांत धनावडे, माजी सचिव तथा विद्यमान संचालक अनंत धनावडे, प्राचार्य जे. जी. पोटे, पर्यवेक्षक विष्णू धुमाळ व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते