🛑साई प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेचे रायगड जिल्हा परिषदेच्या सदस्या स्वातीताई नवगणे यांनी केले लोकार्पण
रायगड वेध माणगांव प्रतिनिधी अमित सारंगे
आज दि. 16 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 11.00 वाजता १४ वा वित्त आयोग अंतर्गत साई प्राथमिक केंद्रास रा.जि.प. सदस्या स्वातीताई नवगणे यांच्या हस्ते रुग्णवाहिका लोकार्पण करण्यात आली. या रुग्णवाहिकेमुळे परिसरातील गरजु रुग्णांना वेळेवर उपचारासाठी तालुक्याच्या ठिकाणी नेण्यास उपयोग होणार आहे.
यावेळी शिवसेनेचे माणगांव तालुका अध्यक्ष गजानन अधिकारी, माणगांव पंचायत समितीचे उपसभापती सुजित शिंदे, तळाशेत ग्रामपंचायत सरपंच रोशनी नवगणे, प्रतीक्षा जाधव, अश्विनी नाक्ते, साई ग्रामपंचायत माजी उपसरपंच अनिस सोलकर, विष्णू भोसले, गफार राहटविलकर, सौद कोंडवीलकर, रहूप करदेकर, प्रशांत अधिकारी, नरेश अधिकारी तसेच साई प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप भालके, परिचारिका राऊत, मंचेकर, लिपिक मंगेश ठाकूर, वाहनचालक प्रतिक पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.