Type Here to Get Search Results !

🛑अबब !!! श्रीवर्धन मध्ये सापडला घोळ मासा, किंमत २ लाख ६१ हजार रूपये


🛑अबब !!! श्रीवर्धन मध्ये सापडला घोळ मासा, किंमत २ लाख ६१ हजार रूपये

टिम रायगड वेध

श्रीवर्धन तालुक्यातील जीवना बंदर येथे मासेमारीसाठी गेलेल्या मच्छीमारांच्या जाळ्यात २२ किलो वजनाचा घोळ मासा सापडला. या माश्याची लिलावात तब्बल २ लाख ६१ हजार रुपयांना विक्री करण्यात आली. त्यामुळे हा मासा पकडणारे मच्छीमार चांगलेच मालामाल झालेत. जीवना बंदरावरील मच्छिमार जयेंद्र पाटील, उद्देश पावशे, हेमंत चुनेकर व नितीन पाटील हे समुद्रात मासेमारीसाठी गेले होते. जाळी लावून बसले असतांना, जाळ्यात मोठा मासा अडकल्याचे त्यांच्या लक्षात आले. हा मासा सुटण्यासाठी धडपड करत होता, ही बाब लक्षात येताच त्यांनी तातडीने जाळे वर ओढले आणि जाळ्यासोबत माश्याला किनाऱ्यावर घेऊन आले. जाळ्यात भला मोठा घोळ मासा अडकल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. 


किनाऱ्यावर झालेल्या लिलावात स्थानिक व्यापाऱ्यांनी माश्याला २ लाख ६१ हजारांची बोली लावून हा मासा खरेदी केला. त्यामुळे चारही मच्छीमार मालामाल झाले आहेत. घोळ हा मासा कोकण किनारपट्टीवर क्वचितच सापडतो. चविष्ट आणि गुणकारी असल्याने त्याला मोठी मागणी असते, त्याच बरोबर माश्याचे जठर आणि फुफ्फुस आदी अवयवांचा वापर शल्यचिकित्सेसाठी लागणारे धागे बनविण्यासाठी केला जात असल्याचे स्थानिक मच्छीमार सांगतात. जुलै ते सप्टेंबर या कालावधीत हा मासा किनाऱ्या लगतच्या परीसरात आढळून येतो. या माश्याला चांगलीच मागणी असल्याच मच्छीमारांचे म्हणणे आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test