🛑७५ वा स्वातंत्र्य दिन पोलादपुरात उत्साहात साजरा, पूरपरिस्थितीच्या काळात योगदान दिलेल्यांचा सन्मान
रायगड वेध पोलादपूर प्रतिनिधी देवेंद्र दरेकर
देशाचा 75 वा स्वातंत्र्य दिन आज पोलादपूर शहरासह तालुक्यात विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानंतर अनेकांच्या उपस्थितीत पोलादपूर तहसील कार्यालयच्या प्रांगणात साडेनऊ वाजता प्रभारी तहसीलदार समीर देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहण करून स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला त्यानंतर 22 जुलै रोजी महाड पोलादपूर येथे पूर्व दरड कोसळून जनजीवन विस्कळीत झाले यावेळेला मदतीसाठी मोलाचे योगदान दिलेल्या शासकीय अधिकारी व कर्मचारी, पत्रकार, लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ अशांचा सन्मान देखील यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.त्याचबरोबर पुरामध्ये स्वतःच्या घरात पाणी असताना देखील प्रभारी तहसीलदार समीर देसाई यांनी कोणतीही परवा ना करता तालुक्यातील आपली भूमिका चोख बजावल्याने महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाच्यावतीने प्रभारी तहसीलदार समीर देसाई यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रभारी तहसीलदार समीर देसाई, गटविकास अधिकारी धनंजय जगताप,पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत जाधव, उपनिरीक्षक चांदके, नगरपंचायतचे मुख्याधिकारी विराज लबडे, रा जि प सदस्य चंद्रकांत कळंबे, शैलेश सलागरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते